State Of Uttar Pradesh | उत्तर प्रदेश माहिती व राज्यातील 4 अतिशय सुंदर काही पर्यटन स्थळे

State Of Uttar Pradesh उत्तर प्रदेश राज्य या राज्याचा जर मित्रांनो आपण विचार केला तर हे आपल्या भारतातील उत्तर भागांमधील असलेले एक राज्य आहे देशातील सर्वात जास्त लोकसंख्या उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये आहे या राज्यातील ऐतिहासिक संस्कृती आणि धार्मिक दृष्ट्या देखील खूप स्थाने महत्त्वाचे आहेत.

State Of Uttar Pradesh

State Of Uttar Pradesh
State Of Uttar Pradesh
आपला WhatsApp ग्रुप जॉईन करा Join Now

भारताच्या उत्तरेस असणारे हे राज्य नेपाळची सरहद आहे मित्रांनो या राज्याच्या पश्चिमेला हरियाणा आणि राजस्थान हे दोन राज्य आहेत त्याचबरोबर दक्षिणेला मध्य प्रदेश तर पूर्वेला बिहार हे राज्य स्थित आहे राज्याच्या उत्तरेकडील भागामध्ये हिमालयाच्या पायथ्याजवळ मैदानी प्रदेश देखील आढळून येतो.

क्षेत्रफळ

State Of Uttar Pradesh उत्तर प्रदेश राज्याच्या क्षेत्रफळाचा जर विचार केला तर 2,43,286 चौरस किमी एवढा क्षेत्रफळ आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्य नद्या गंगा यमुना घागरा गंडक आणि सरीय या उत्तर प्रदेश राज्याच्या मुख्य नद्या आहेत. उन्हाळ्यामध्ये या राज्यात प्रचंड उष्णता असते तर हिवाळ्यामध्ये थंड हवामान आढळून येते.

लोकसंख्येचा जर विचार केला तर भारतामधील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले हे उत्तर प्रदेश राज्य आहे या राज्यांमध्ये 2021 च्या अंदाजानुसार लोकसंख्या 24 कोटी इतकी आहे. भारतातील सर्वात जास्त लोकसंख्येचे राज्य म्हणून ओळखले जाते या राज्याची मुख्यभाषा ही हिंदी असून ते राज्यातील सर्व सामान्यांशी बोलीभाषा देखील आहे हिंदी भाषा उत्तर प्रदेश मध्ये प्रामुख्याने बोलली जाते त्याचबरोबर बुंदेली भोजपुरी या स्थानिक बोलीभाषा देखील बोलल्या जातात त्याचबरोबर उर्दू भाषा देखील मोठ्या प्रमाणामध्ये उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये वापरली जाते.

कृषि

उत्तर प्रदेश राज्याच्या कृषी विस्तारात साजरा पण विचार केला तर उत्तर प्रदेश या भागातील लोक जास्त प्रमाणात कृषी वरती आधारित आहेत आधुनिक काळामध्ये उद्योग सेवा क्षेत्र आणि पर्यटन देखील मोठ्या प्रमाणामध्ये उत्तर प्रदेश राज्य मध्ये आढळून येत आहे. उत्पन्न सर्वात जास्त उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये गव्हाचे उत्पादन घेतले जाते त्याचबरोबर ऊस तांदूळ डाळी आणि भाजीपाला अशी प्रमुख पिके उत्तर प्रदेश राज्यात घेतात उसाचे प्रमाण सर्वात जास्त उत्तर प्रदेश राज्यांमध्ये होते.

उत्तर प्रदेश राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळे

1.ताजमहल

प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे ताजमहल हे State Of Uttar Pradesh उत्तर प्रदेश राज्यांमध्ये आहे मित्रांनो भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि जागतिक स्तरावर ओळखले जाणारे स्मारक म्हणजे ताजमहाल आहे हे प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते भव्यसंग्राम वरी मकबरा आग्रा येथे यमुना नदीच्या काठी ताजमहल स्थित आहे. 1983 साली युनेस्को ताजमहाला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते आज जगातील सात आश्चर्यांपैकी एक मानले जाते ताजमहल ची आकृती अतिशय सुंदर आणि प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते.

या ताजमहालची निर्मिती मित्रांनो शहाजहाने आपली प्रेयसी मुमताज महल यांच्या स्मरणामध्ये केलेली आहे मुमताज महाल चा मृत्यू हा 1631 मध्ये बाळंतपण दरम्यान झाला होता त्यामुळे त्यांचे पती शहाजहान हे अत्यंत दुखी झाले आणि त्यांच्या प्रेमाची आठवण म्हणून ताजमहल हे स्मारक उभे केले.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे स्मारक उभा करण्यासाठी तब्बल 22 वर्षे लागले होते ताजमहल बांधण्याची सुरुवात ही 1632 मध्ये सुरू झाली आणि 1653 मध्ये ते पूर्ण झाले होते तब्बल बावीस वर्षे ताजमहालचे काम चालले होते. आणि या प्रकल्पामध्ये 20000 पेक्षा अधिक कामगार शिल्पकार आणि विविध लोके शामिल होती.

बाग

मित्रांनो ताजमहालच्या चारही बाजूंनी चार भाग पद्धतीने बनवलेली अतिशय सुंदर बाग देखील आहे ज्यामध्ये सर्व प्रकारचे फुले झाडे त्याचबरोबर पाण्याचे तलाव आणि हिरवीगार झाडे आढळून येते त्याच ठिकाणी मध्यभागी प्रतिबिंब तलाव ताजमहालाच्या सौंदर्यात भर घालतो कारण मित्रांनो त्या पाण्यामध्ये ताजमहालचे संपूर्ण प्रतिबिंब दिसते आणि ते आणखी सुंदर दिसून पर्यटकांना वेड लावते.

State Of Uttar Pradesh मित्रांनो ताजमहाल ही फक्त एक सुंदर इमारत नसून ते अमर प्रेमाचे प्रतीक म्हणून भारतामध्येच नाही तर संपूर्ण जगामध्ये ओळखले जाते ताजमहालचा इतिहास सौंदर्य आणि शिल्पकलेचा प्रभाव लोकांना खूप जास्त प्रमाणामध्ये प्रेरित करताना दिसून येतो. भारतातूनच नाही तर संपूर्ण जगामधून ताजमहल पाहण्यासाठी लोक येतात आणि पाहण्याचा अनुभव हा अविस्मरणीय ठरवून आयुष्यभर ते प्रेमाचे प्रतीक आहे ही गोष्ट आठवणीत ठेवून जीवन जगून आनंदी होतात.

2.आयोध्या

राम मंदिर आणि बाबर मज्जिद वाद हा खूप वर्ष चालला होता त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने यावरती निकाल देऊन 2019 मध्ये आयोध्या या ठिकाणी राम मंदिर बांधण्यास परवानगी दिली आहे .

आपल्या भारतामधील उत्तर प्रदेश राज्यांमध्ये असलेली एक पवित्र आणि ऐतिहासिक नगरी म्हणून ओळखली जाणारी आहे कारण या ठिकाणीच भगवान श्री राम यांचा जन्म झालेला आहे .आयोध्याला राम जन्म भूमी म्हणून ओळखले जाते. यामुळे ती धार्मिक सांस्कृतिक आणि राजकीय दृष्टिकोनातून खूप जास्त प्रमाणामध्ये महत्त्वपूर्ण ठरलेले आहे.

आयोध्या नगरीचा उल्लेख हा प्राचीन रामायण काव्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आहे जिथे ती कोसळ राज्याची राजधानी होती प्रभू श्रीरामांचा जो विष्णू अवतार मानला जात होता त्याच नगरीमध्ये जन्माला. अयोध्या हे फक्त हिंदू धर्मासाठी नव्हे तर त्याचबरोबर बौद्धजन आणि इस्लामिक धर्म यांनाही खूप जास्त प्रमाणामध्ये महत्त्वाचे मानले जाणारे त्यांचे स्थान आहे.

अयोध्या या ठिकाणी राम मंदिर आणि बाबर मज्जिद वाद हा खूप वर्ष चालला होता त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने यावरती निकाल देऊन 2019 मध्ये आयोध्या या ठिकाणी राम मंदिर बांधण्यास परवानगी दिली आणि राम मंदिर उभारण्याचे काम हे मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेले आहे. सध्या संपूर्ण भारतातील आणि जगातील लोक प्रसिद्ध राम मंदिर पाहण्यासाठी आणि प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी येतात.

आयोध्या मध्ये राम जन्मभूमी मंदिर हे पवित्र स्थान आहे त्याचबरोबर हनुमान गळी देखील त्याच ठिकाणी आपल्याला दर्शन करण्यासाठी मिळते आजार ठिकाणावरून भावी भक्त त्याठिकाणी दर्शनासाठी येतात त्याचबरोबर कनक भवन हे ठिकाण देखील आहे सर्व नदीचे घाट महत्वपूर्ण नदी अयोध्या या नदीकाठी बसलेले आहे. ती नदी म्हणजे सरीय गंगेच्या महत्त्व प्रमाणे सजीव नदीमध्ये स्नान करणे हे अतिशय पुण्यकारक मानले जाते आणि त्या ठिकाणी स्नान केल्यानंतर माणूस पवित्र होतो असे मानले जाते.

3.सारनाथ

मित्रांनो सारनाथ हे उत्तर प्रदेश मधील वाराणसी पासून दहा किमी अंतरावर एक अतिशय पवित्र ठिकाण आहे हे पवित्र ठिकाण बौद्ध धर्माच्या इतिहासामध्ये सारना झाला अत्यंत महत्त्वाचे आहे कारण हे तेच भगवान गौतम बुद्धांनी आपला पहिला धर्म उपदेश केला होता.

या ठिकाणी सम्राट अशोकांनी बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अनेक स्तूप आणि स्तंभ उभारले आहेत अशोकाच्या सिंहासंब हा भारतीय संस्कृतीचा अतिशय महत्त्वाचा प्रतीक ठरलेला आहे आणि तो सध्या आपल्या भारताचा राष्ट्रीय चिन्ह म्हणून देखील प्रसिद्ध आहे.

4.मथुरा

मथुरा हे ठिकाण भगवान श्रीकृष्ण यांचे जन्मभूमी म्हणून ओळखले जाणारे ठिकाण आहे प्राचीन काळामध्ये मथुराही व्यापारी आणि संस्कृत केंद्र देखील होते आणि त्यामुळे ते खूप जास्त प्रमाणामध्ये प्रसिद्ध देखील होते. श्रीकृष्ण जन्मभूमी हे मथुरा या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी श्रीकृष्ण यांचा जन्म झालेला आहे असे म्हणतात मंदिराचा विभाग जर पाहिला तर तात्कालीन कारागृहाच्या जागेवरती बांधलेला दिसून आपल्याला येतो.

आणखी माहितीसाठी येथे क्लिक करा

5.झाशी

मित्रांनो झाशी एक उत्तर प्रदेश राज्यांमध्ये ऐतिहासिक आणि संस्कृतीत दृष्ट्या अतिशय महत्त्वपूर्ण शहर आहे हे शहर 1857 च्या स्वातंत्र्यसंग्रामामध्ये राणी लक्ष्मीबाई यांचे पराक्रमाने बलिदान यामुळे झाशीचे नाव इतिहासामध्ये आजरा अमर झालेले आहे यासाठीच ऐतिहासिक वारसा प्रसिद्ध देखील आहे.

राणी लक्ष्मीबाई यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध खूप मोठ्या दाटसाने लढा दिलेला आहे आणि आपल्या प्रजेसाठी बलिदान देखील दिले आहे या लढ्यामुळेच झाशी भारतीय सौंदर्यात लढ्याचे प्रेरणास्थान बनलेले आहे व झाशीची राणी हे जगभरामध्ये प्रसिद्ध असलेली राणी आहे.

बांधकाम कामगारांना मोफत भांडी वाटप सुरू आहे येथे पहा

मित्रांनो झाशी हे फक्त ऐतिहासिक स्थळ म्हणून ओळखले जाणारे स्थळ नाही तर हे भारतामधील स्वातंत्र्यलढ्याचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे मोठे स्थळ आहे. लक्ष्मीबाईंच्या पराक्रमाच्या आठवणींनी स्मरतेत असलेले हे ठिकाण आहे आजही पर्यटकांना प्रेरणा देणारे किल्ले संग्रहालय आणि उत्सवांमुळे झाशी पर्यटन स्थळ हो ओळखले जाते झाशीची राणी.

आज आपण उत्तर प्रदेश राज्यांमध्ये अतिशय महत्त्वाची काही ठिकाणी पाहिले आहेत आणि उत्तर प्रदेश राज्याविषयी सविस्तर माहिती देखील पाहिलेले आहे ताजमहल त्याचबरोबर मथुरा आयोध्या अशा विविध प्रकारचे पर्यटन स्थळे आपण वर पाहिले आहेत. तुम्हाला ही माहिती आवडली नक्कीच असेल तुमच्या मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा आणि वर दिलेल्या पर्यटन स्थळांपैकी पर्यटकांना तुम्ही नक्की भेट द्या.

हे नक्की वाचा

मित्रांनो तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन केलं नसेल तर लगेच वर दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून अशाच प्रकारे नवनवीन महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती तुम्हाला सर्व योजनांची माहिती त्याचबरोबर नोकरीचे अपडेट भारतातील आणि महाराष्ट्रातील नोकरीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहील. त्यासाठी वर दिलेली लिंक वर क्लिक करा आणि लगेच आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा धन्यवाद.