Sant Dnyaneshwar Maharaj |संत ज्ञानेश्वर महाराज जीवन चारित्र्य | एकदा वेळ काढून नक्की वाचा मन प्रसन्न होईल

Sant Dnyaneshwar Maharaj मित्रांनो आज आपण श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवन चरित्र विषयी अतिशय महत्त्वाची आणि मन प्रसन्न होणारी माहिती पाहणार आहोत. ही माहिती तुम्ही वाचल्यानंतर तुमचे विचार खूप जास्त बदलतील आणि तुमचे मन प्रसन्न होईल संत ज्ञानेश्वर महाराज हे महाराष्ट्रातील महान संत कवी आणि तत्त्वज्ञ होते त्यांच्या जीवन चरित्रातून भारतीय भक्ती परंपरेतील महान योगदान दिसून येत आहे.

Sant Dnyaneshwar Maharaj
Sant Dnyaneshwar Maharaj
आपला WhatsApp ग्रुप जॉईन करा Join Now

Sant Dnyaneshwar Maharaj |संत ज्ञानेश्वर महाराज जीवन चारित्र्य | एकदा वेळ काढून नक्की वाचा मन प्रसन्न होईल

महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथामुळे आपल्या मराठी भाषेला धार्मिक आणि दर्शनीक साहित्याचा अमूल्य ठेवा मिळालेला आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये अबूतपूर्व कार्य केलेले आहे आणि याच कार्यामुळे त्यांना माऊली म्हणून सर्व महाराष्ट्रात आणि भारतात संबोधले जाते.

Sant Dnyaneshwar Maharaj महान संत होऊन गेलेले श्री ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म हा 1275 साली आपल्या महाराष्ट्रामध्ये असलेल्या पैठण या ठिकाणी झाला होता संत ज्ञानेश्वरांचे मूळ नाव हे ज्ञानदेव असे होते त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठल पंत कुलकर्णी आणि संत ज्ञानेश्वरांच्या आईचे नाव रुक्मिणी असे होते.

मित्रांनो हे धार्मिक विचारांचे होते श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठल पंत हे वारकरी संप्रदायाचे होते आणि त्यांनी संसारिक जीवन सोडून संन्यास घेतला होता परंतु त्यांच्या गुरूंच्या आज्ञांनी त्यांना संसारात परत पाठवले व त्यांना संसारामध्ये परत यावे लागले याच गोष्टीमुळे संपूर्ण समाजाने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला बहिष्कृत केले होते आणि याच कारणामुळे त्यांच्या कुटुंबांना म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांना आणि त्यांच्या भावंडांना व बहिणींना समाजाचा खूप त्रास सहन करावा लागला होता.

संत ज्ञानेश्वर महाराज यांचे बालपण

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या बालपणाचा जर विचार केला तर त्यांचे बालपण हे अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये गेलेले होते ज्ञानेश्वर महाराजांना बालपणापासूनच त्यांची अध्यात्म आणि भक्तीमध्ये खूप जास्त आवड होती ते लहान होते त्यावेळी त्यांनी संस्कृत आणि वेदांचे खूप जास्त प्रमाणामध्ये ज्ञान मिळवून घेतले होते अत्यंत कमी वयामध्ये त्यांनी शास्त्रज्ञान आणि धर्मातील गोडता समजून घेतलेली होती.

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आयुष्यातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची घटना जी तुम्हाला माहिती असेलच ती म्हणजे त्यांनी लिहिलेला भाष्यग्रंथ त्यांनी लिहिलेला भाष्य ग्रंथ कोणता आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का तो म्हणजे ”ज्ञानेश्वरी” ज्ञानेश्वरी हे मराठी भाषेतील पहिले मोठे धार्मिक आणि दर्शनीक साहित्य मानले जाते. मित्रांनो हा ग्रंथ संत ज्ञानेश्वर महाराजांनी 1290 साली लिहिलेला होता.

ज्ञानेश्वरांनी लिहिलेले ग्रंथ

Sant Dnyaneshwar Maharaj ज्ञानेश्वरी हा ग्रंथ तर महाराजांनी लिहिलाच होता परंतु त्याशिवाय त्यांनी अमृतानुभव हा दुसरा देखील अतिशय चांगला ग्रंथ लिहिलेला आहे या ग्रंथांमध्ये त्यांनी अधिवेक तत्त्वज्ञानाचे खूप चांगल्या प्रकारे आणि सहजपणे समजेल या भाषेमध्ये स्पष्टीकरण दिलेले आहे त्याचबरोबर संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाची विचारधारा रुजवण्यासाठी खूप मोठे योगदान दिलेले आहे आपण जर पाहिलं तर वारकरी संप्रदाय हा मोठ्या प्रमाणामध्ये भक्ती मार्गावर आधारित आहे ज्यामध्ये विठोबा भक्तीला प्रमुख स्थान दिलेले आहे.

आपण जर पाहिलं तर श्रीSant Dnyaneshwar Maharaj हे फक्त केवळ संत नव्हते तर त्यांनी समाज सुधारकही होते त्यांची शिकवण अशी होती मित्रांनो की लोकांना जातीपातीच्या बंधनापासून मुक्त व्हावे लोकांनी जातीभेद करू नये आता जर आपण पाहिलं तर प्रत्येक माणूस प्रत्येक मुलगा प्रत्येक जण जाती-धर्मा ची गणना करत आहे. तो या जातीचा मी या जातीचा असे भाग पाडत आहे.

संत ज्ञानेश्वर महाराजांनी असे कधीही केले नाही उलट ते लोकांना सांगायचे जातीपाती करू नका सर्व एकत्र मिळून राहा एकजुटीने राहा असा संदेश ते लोकांना द्यायचे त्यांचे विचार लोकशिक्षणासाठी देखील होते प्रत्येक माणसाला भगवंताच्या प्राप्तीसाठी समान संधी दिले द्यायला हवी असे म्हणायचे त्यांचे शिकवण फक्त धार्मिक नव्हती तर ती सर्व समाज सुधारण्यासाठी देखील करत होते आणि मोठे योगदान दिलेले होते.

संत ज्ञानेश्वर महाराज रेड्याच्या तोंडून वेदमंत्र

आपल्या महाराष्ट्रावईषयी अतिशय महत्वाची आणि संपूर्ण माहिती येथे दिलेली आहे पाहण्यासाठी येथे क्लीक करा

मुख्य घटना म्हणजे Sant Dnyaneshwar Maharaj यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी घडवून आणलेली अतिशय महत्त्वाची घटना ती म्हणजे त्यांनी एका रेड्याला वेदमंत्र मनवले होते ही घटना त्यावेळी ऋणी वादी समाजाच्या प्रथांना आव्हान देणारी होती कारण त्यांनी समाजाला असे दाखवून दिले की भगवंताच्या कृपेने कोणत्याही प्राण्यात ज्ञानाचे साक्षात्कार होऊ शकतात. आणि त्यांनी साक्षामध्ये एका रेड्याला मंत्र म्हणण्यास मजबूर केले व लोकांचे तोंड बंद करून त्यांना देव आहे की नाही हे समजावून दिले.

महाराजांनी केवळ 21 व्या वर्षी समाधी घेऊन आपले शरीर त्यागले त्यांच्या समाधीची कथा अत्यंत धार्मिक आहे त्यांनी आपल्या स्वतःच्या इच्छेने महाराष्ट्रामध्ये पुणे जवळ असलेल्या आळंदी येथे जिवंत समाधी घेतलेली आहे. आणि त्यांच्या समाधीची ही जी घटना आहे ही घटना भारतीय अध्यात्मिक परंपरेतील एक महत्त्वाची घटना मानलेली आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आजही श्रद्धेने प्रमुख स्थान आहे आणि आळंदी या ठिकाणी प्रत्येक वर्षी महाराष्ट्र मधूनच नाही तर संपूर्ण भारतातून लाखो प्रमाणामध्ये भक्त त्याठिकाणी येतात व त्यांच्या समाधीला भेट देऊन मन प्रसन्न करतात असे महान संत होणे पुन्हा शक्य नाही.

आपल्या महाराष्ट्रातील 10 अतिशय महान संत कोणते होऊन गेले पहा यावर क्लिक करा

श्री संत सोपान देव महाराज

मित्रांनो Sant Dnyaneshwar Maharaj यांचे लहान भाऊ ते म्हणजे संत सोपान देव महाराज महाराष्ट्रातील एक महान संत होते सोपान महाराजांचा जन्म हा एका अध्यात्मिक आणि धार्मिक कुटुंबामध्ये झाला होता. संत ज्ञानेश्वर महाराजांचे लहान भाव असल्यामुळे त्यांच्यावरती संस्कार हे अतिशय चांगले हे लहानपणापासूनच झालेले होते त्यांच्या घराण्यामध्ये मोठे भाऊ ज्ञानेश्वर महाराज आणि एक बहीण मुक्ताई यांच्यासारखेच तेही फक्त मार्गाने वेळलेले होते आणि अतिशय वारकरी संप्रदायाची आवड असलेले हे भाऊ व बहीण होते.

संत ज्ञानेश्वर महाराजांचे लहान भाऊ सोपान देव यांचा जन्म हा 1277 च्या सुमारास पैठण याच ठिकाणी झालेला होता. सोपान महाराजांचा अध्यात्मिक अभ्यास आणि साधना कधीही थांबली नाही त्यांनी आपल्या भावांसह संत ज्ञानेश्वर आणि मुक्ताई यांच्या सहवासामध्ये त्यांच्याकडून चांगले ज्ञान घेऊन आयुष्यामध्ये कसे जगावे आणि लोकांसोबत कसे वागावे पाप-पुण्य याविषयी सर्व प्रकारचे धार्मिक माहिती शिकले व त्यांच्यासोबत राहून आध्यात्मिक गुड तत्वांचे ज्ञान मिळवले.

ज्याप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराजांनी 21 व्या वर्षी समाधी घेतली त्याच प्रमाणे सोपान महाराज यांनी देखील अत्यंत कमी आणि लहान वयामध्ये 24 वर्षाचे असताना समाधी घेतलेली आहे. त्यांचे समाधी स्थळ सासवड पुणे या ठिकाणी आहे आणि हे स्थान यामुळेच आजही लाखो भक्तांसाठी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे सोपान महाराजांच्या समाधीवर भक्त वारंवार जातात आणि त्यांच्या अध्यात्मिक कर्माचे स्मरण करतात तिथे गेलेले प्रत्येक जण हे मन प्रसन्न करून येतात व त्यांच्या पायावरती नतमस्तक होतात.

संत निवृत्ती महाराज

मित्रांनो श्री संत निवृत्ती महाराज हे ज्ञानेश्वर महाराजांचे मोठे भाऊ होते आणि त्यांचे आध्यात्मिक गुरु देखील होते. हे देखील श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रमाणे अतिशय चांगल्या स्वभावाचे होते ते अत्यंत गोडवादी आणि ध्यान मार्गातील अतिशय मोठे संत होऊन गेले त्यांच्या विचारांमुळे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव पडला. आणि त्यांना अध्यात्मक उंची काढण्यासाठी संत निवृत्ती महाराज यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रेरणा दिली त्यांनी आपल्या साधनेमधून गुरु आणि शिष्य परंपरेचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आदर्श निर्माण करून दाखवला.

मुक्ताबाई म्हणजेच मित्रांनो श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची बहीण होती मित्रांनो या कुटुंबामध्ये सर्वात अध्यात्मिक मानली जाणारी स्त्री म्हणजे मुक्ताबाई मुक्ताबाई एक आदर्श योगिनी आणि भक्ती होत्या त्यांची साधना अत्यंत गोड होती.

Sant Dnyaneshwar Maharaj आखिल विश्वाची कामना परमेश्वरा जवळ करणारे संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या या महाराष्ट्रातील भूमीमध्ये जन्माला आले हे मराठी माणसाचे खूप मोठे भाग्य आहे एवढे मोठे संत आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आले आणि आपल्या सहवासामध्ये त्यांनी त्यांचं हक्क जीवन घालवलं. तेराव्या शतकामधील महान संत वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असलेले आपल्या अवघ्या वयाच्या 21व्या वर्षी च्या आयुष्यामध्ये संपूर्ण विश्वाला जगण्याचा मार्ग दाखवलेले महान संत म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर महाराज संत ज्ञानेश्वर महाराजांविषयी या लेखांमध्ये आज आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहिलेली आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज यांचे मूळ नाव ज्ञानदेव विठ्ठल कुलकर्णी असे होते यांची समाधी आळंदी जिल्हा पुणे या ठिकाणी आहे संत ज्ञानेश्वर महाराज यांचे गुरु निवृत्तीनाथ भाषा यांची होती मराठी यांनी लिहिलेले ग्रंथ अतिशय महत्त्वपूर्ण ठरलेले ते म्हणजे ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव हरिपाठ अभंग भक्ती कविता यांच्या वडिलांचे नाव विठ्ठल पंत कुलकर्णी असे होते.

Sant Dnyaneshwar Maharaj यांना महाराष्ट्रामध्ये भक्ती भावाने माऊली असे म्हटले जायचे ते अतिशय थोर संतवा प्रतिभा संपन्न कवी देखील होते त्यांचा जन्म हा संभाजीनगर जिल्ह्यातील आपेगाव येथे 1275 मध्ये झालेला होता. त्यांचे वडील विठ्ठल पंतांनी लग्नानंतर काही दिवसातच संन्यास घेतला होता मात्र गुरूंनी आज्ञा दिल्यामुळे गुरुच्या आज्ञा नुसार त्यांना संसारामध्ये परत यावे लागले संसारामध्ये परत आल्यानंतर त्यांना अनेक अडचणी आल्या समाजाने त्यांना वाळीत टाकले त्यांना चार अपत्य होती निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई या चारही भावंडांना संन्याशाची मुले म्हणून वाईट टाकण्यात आले.

मित्रांनो आज आपण श्री संत ज्ञानेश्वर महाराजांविषयी अतिशय महत्त्वाची माहिती आणि त्यांचे संपूर्ण जीवन चरित्र या लेखाच्या माध्यमातून पाहिले आहे कशाप्रकारे संतांनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्रास सहन केला समाजाला तोंड दे त्यांनी जीवन कसे जगले हे वाचून तुमचे मन देखील प्रसन्न झाले असेल तुम्हाला जर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांविषयी आपण लिहिलेले हे शब्द आवडले असतील तर तुमच्या मित्र-मैत्रिणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय l

हे नक्की वाचा

मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर लगेच आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून अशाच प्रकारे नवनवीन महत्त्वाची माहिती आणि महाराष्ट्रातील आणि भारतातील सर्व नोकरी त्याचबरोबर योजना अशा प्रकारची नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहील त्यासाठी आत्ताच वर दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा धन्यवाद.