Gavran Kombdi Palan Kase karave | गावराण कोंबडीपालण कसे करावे | फक्त अंडी विक्रीतुन 50 हजार महिना कमवा

Gavran Kombdi Palan Kase karave

Gavran Kombdi Palan Kase karave गावरान कोंबडी पालना मधून आपण कशाप्रकारे योग्यरीत्या पालन करून योग्य ती कोंबडीची जात निवडून फक्त अंडी विक्रीतून 50 हजार रुपये महिना कमवू शकतो. याविषयी आज आपण या लेखाच्या माध्यमातून अतिशय सविस्तर आणि सरळपणे माहिती पाहणार आहोत त्यासाठी ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.

Gavran Kombdi Palan Kase karave
Gavran Kombdi Palan Kase karave
आपला WhatsApp ग्रुप जॉईन करा Join Now

Gavran Kombdi Palan Kase karave गावरान कोंबडी पालन हा व्यवसाय आपल्या भारत देशामध्ये अतिशय जास्त प्रमाणामध्ये केला जातो प्रमुख म्हणजे ग्रामीण भागामध्ये प्रसिद्ध असलेला हा व्यवसाय आहे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणामध्ये गावरान कोंबडी पालन हा व्यवसाय केला जातो. गावरान कोंबड्या म्हणजेच स्थानिक जातीच्या कोंबड्या ज्या कोंबड्यांना कमी देखरेखी मध्ये आणि अतिशय कमी खर्चामध्ये आपण पाळू शकतो या कोंबड्यांना आपण नैसर्गिक वातावरणामध्ये वाढवू शकतो आणि त्यांचे मांस व अंडे विकून आपण अतिशय चांगल्या प्रकारे फायदा मिळवू शकतो.

गावरान कोंबड्यांचे अंडे अतिशय जास्त प्रमाणामध्ये विकले जातात त्यांच्या अंड्यांची मागणी बाजारामध्ये खूप जास्त आहे आणि अंड्यांना भाव देखील खूप जास्त आहे सध्या जर आपण पाहिलं तर मार्केटमध्ये भेसळयुक्त अंडे गावरान म्हणून दिले जातात परंतु गावरान अंडी सहजपणे ओळखायला येतात गावरान अंडी काळसर् व लहान असतात.

गावरान कोंबड्यांच्या Gavran Kombdi Palan Kase karave जाती जर आपण पाहिलं तर आपल्या भारतामध्ये विविध प्रकारच्या कोंबड्यांच्या जाती आढळून येतात त्यामध्ये जर पाहिलं तर कडकनाथ त्याचबरोबर कालीमाशी आणि देशी कोंबड्या अशा विविध प्रकारच्या जातींच्या कोंबड्या आपल्याला आढळतात वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये त्यांच्या हवामानानुसार त्या जाती आढळून येतात. त्यांचे अंडे आणि मास हे जास्त प्रमाणामध्ये विकले जाते व ते शारीरिक दृष्ट्या खूप लाभदायक असते. कडकनाथ कोंबड्यांचे मासे काळसर रंगाचे असते आणि त्याला बाजारामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये मागणी आहे व उच्च किंमत देखील आहे.

वीर भगतसिंग यांच्या जीवनातील शेवटचे 24 तास व त्यांचे संपूर्ण जीवन कसे होते पाहण्यासाठी येथे क्लिक करा

गावरान कोंबडी पालन करण्याचे फायदे

जर आपल्याला Gavran Kombdi Palan Kase karave गावरान कोंबडी पालन करायचे असेल तर आपल्याला जास्त गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही आपण अतिशय थोड्या खर्चामध्ये देखील गावरान कोंबडी पालन करू शकतो. कारण गावरान कोंबड्यांना नैसर्गिक चारा प्रणालीत वाढवलं जातं आणि त्यामुळे खाद्यावरचा खर्च वाचतो आपल्याला खाद्य खर्च करण्याची आवश्यकता पडत नाही.

त्याचबरोबर आपल्याला कोंबडी पालन करण्यासाठी जास्त जागेची आवश्यकता लागत नाही गावरान कोंबड्या खुल्या वातावरणामध्ये किंवा मोजक्या जागेमध्ये बसतात आपण जर थोड्या जागेमध्ये वर आडवी लाकडे बांधली तर सर्व कोंबड्या रात्री त्या लाकडावरती जाऊन बसतात. आणि अतिशय कमी जागेमध्ये जास्त कोंबड्या आपण सांभाळू शकतो.

गावरान कोंबडी पालनामध्ये अंडी उत्पादन प्रमुख ठरलेले आहे गावरान कोंबड्या या जास्त प्रमाणामध्ये अंडी देतात आणि गावरान अंड्याला बाजारामध्ये किंमत खूप जास्त आहे आणि मासाला देखील किंमत आहे गावरान अंडे हे आरोग्यासाठी अतिशय चांगले असतात कारण त्यामध्ये पोषण तत्व असतात त्यामुळे लोक आवडीने बॉयलर अंडी न खाता गावरान अंडी कडे वळतात.

कोंबडी पालन सुरू करण्याआधी घ्यायची काळजी

या गोष्टी लक्षात ठेवा

मित्रांनो कोंबडी पालन सुरू करण्याआधी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत त्या आपण पाहणार आहोत सर्वप्रथम तुम्हाला जागेची निवड करणे महत्त्वाचे आहे. गावरान कोंबडी पालनासाठी तुम्हाला मोकळी जागा असणे आवश्यक आहे आणि शांत वातावरण असणे आवश्यक आहे कोंबड्यांची वाढ लवकर होण्यासाठी ताजे वातावरण महत्त्वाचे असते त्याचबरोबर त्यांना दररोज ताजे पाणी देखील प्यायला मिळायला हवे.

शेडची निवड करताना तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे शेड तयार करायचे आहे कोंबड्यांना रात्री बसण्यासाठी शेडमध्ये तुम्हाला आडवी उभी लाकडे बांधायचे आहेत त्या लाकडावरती कोंबड्या Gavran Kombdi Palan Kase karave रात्री जाऊन बसतात दिवसभर कोंबड्या बाहेर नैसर्गिक वातावरणामध्ये फिरतात आणि रात्री शेडमध्ये जातात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेडमध्ये तुम्हाला ओली जागा ठेवायची नाही खाली तुम्हाला कोरड्या जागेची व्यवस्था करायची आहे. ओली जागेवरती कोंबड्या बसल्या तर कोंबड्यांवरती विविध प्रकारचे आजार येतात त्यामध्ये देवी येणे, सर्दी होणे त्याचबरोबर भूल येणे अशा विविध प्रकारचे आजार ओली जागा असल्यामुळे कोंबड्यांवरती येतात.

खाद्य व्यवस्थापन करताना तुम्हाला कुठल्याही प्रकारचा केमिकल युक्त खाद्य आणण्याची आवश्यकता नाही तुम्ही आपल्या घरातील खाद्य त्यांना देऊ शकता गावरान कोंबड्या या स्वतःचा अन्न स्वतः शोधून खातात त्या किडे मुंगी विविध प्रकारचे जंतू खाऊन वाढतात नैसर्गिक वातावरणामध्ये स्वतःचे अन्न गावरान कोंबड्या स्वतः ओळखून खातात. त्यांच्या खाद्यामध्ये अन्नधान्य, पालापाचोळा, किडे अशा विविध प्रकारचा आहार घेतात.

Gavran Kombdi Palan Kase karave महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कोंबड्यांच्या शेडमध्ये स्वच्छता बाळगायची आहे तुम्हाला दोन दिवसानंतर तुमचे शेड स्वच्छ करून घ्यायचे आहे शेडमध्ये कुठल्याही प्रकारची दुर्गंधी येता कामा नये आणि शेडमध्ये पाणी देखील येता कामा नये जर शेडमध्ये पाणी आले तर जागा ओली होते आणि त्यावरती जर रात्री कोंबड्या बसल्या तर कोंबड्या वरती विविध प्रकारचे आजार येतात त्यामुळे शेडशी स्वच्छता करणे गावरान कोंबडी पालनामध्ये अतिशय महत्त्वाचा विषय आहे.

त्याचबरोबर त्यांना गरजेप्रमाणे औषध देणं गरजेचं आहे त्यांचे लसीकरण करण्याची आवश्यकता नाही गावरान कोंबडी पालनामध्ये कुठल्याही प्रकारचा लसीकरण करण्याची आवश्यकता तुम्हाला भासत नाही.

कसे करावे गावरण कोंडीपालण आणखी माहिती

कोंबडी पालनात येणाऱ्या अडचणी

मित्रांनो कोंबडी पालन करताना आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणी येतात त्यामध्ये जर पाहिलं तर रोगांची जोखीम गावरान कोंबड्या जरी असल्या तरी त्यांना विविध प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते त्यामध्ये सर्दी, देवी येणे, राणीखेत अशा प्रकारच्या विविध रोगांपासून बचावासाठी तुम्हाला योग्य ती औषधे त्यांच्या पाण्याद्वारे त्यांना द्यायचे आहेत.

पावसाचा परिणाम हा गावरान कोंबड्यांवरती खूप जास्त प्रमाणामध्ये होतो मित्रांनो आपल्याकडे काही वेळा अवकाळी पाऊस येतो अवकाळी पावसाचा परिणाम हा आपल्या गावरान कोंबड्यांवरती होतो आपल्या गावरान कोंबड्या या नैसर्गिक वातावरणामध्ये फिरत असतात आणि या वातावरणामध्ये आणि हवामानामध्ये जो बदल होतो तो बदल गावरान कोंबड्यांवरती खूप जास्त प्रमाणामध्ये प्रभाव पडतो. उष्णता पाऊस किंवा थंडी या तीन ऋतूंमध्ये कोंबड्यांच्या आरोग्यावर आणि त्यांच्या वाढीवरती खूप जास्त प्रभाव पडतो.

अंडी विक्री करण्यासाठी तुम्हाला कशा प्रकारे नियोजन करायचा आहे मित्रांनो जर तुम्ही सर्वप्रथम सुरुवात ही छोट्या प्रमाणामध्ये केलेली असेल तर तुम्ही तुमचे अंडी विक्री उत्पादन हे आठवडे बाजारामध्ये जाऊन देखील ओळखू शकता जर पुढे चालून तुम्ही जास्त प्रमाणामध्ये गावरान कोंबडी पालन केले तर तुम्ही शहरात असलेले किराणा दुकान आणि आठवडे बाजारामध्ये गावरान अंड्यांना खूप जास्त प्रमाणात मागणी असते तेथे तुम्ही थेट विक्री करू शकता.

कोंबडी पालन सुरु करण्यासाठी खर्च

मित्रांनो Gavran Kombdi Palan Kase karave पालनामध्ये जर खर्चाचा विषय आपण पाहिला तर आपल्या इच्छेनुसार आपण खर्च करू शकतो जर तुम्ही छोट्या प्रमाणामध्ये व्यवसाय सुरू करत असाल तर तुम्हाला जास्त खर्च येणार नाही ज्यामध्ये तुम्ही सर्वप्रथम शंभर कोंबड्यांपासून व्यवसाय सुरू करावा. जेणेकरून तुम्हाला अनुभव येईल त्यामध्ये किती खर्च येतो किती खाद्य लागते किती अंडी मिळतात आणि उत्पादन किती होते. याचा हिशोब लागल्यानंतर तुम्ही कोंबड्या वाढवू शकता 100 कोंबड्यांसाठी जर आपण खर्च पाहिला तर तुम्ही जी जात निवडणार आहात त्या जातीनुसार खर्च निश्चित होतो.

शेडची बांधणी करण्यासाठी खर्चाचा हिशोब केला तर तुम्ही छोट्या प्रमाणामध्ये जरी चालू केले तरी दहा हजार ते पन्नास हजार पर्यंत खर्च होऊ शकतो त्यामध्ये मटेरियल बांधकामांनी उपकरणांचा समावेश होतो संपूर्ण खर्च तुम्हाला 50 हजार पर्यंत होऊ शकतो. खाद्य खर्च तुम्हाला कुठल्याही प्रकारचा करण्याची आवश्यकता नाही गावरान कोंबड्यांचे खाद्य हे नैसर्गिक असले तरी काही अतिरिक्त अन्नधान्य आवश्यकता असू शकते ते आपण आपल्या घरी असलेले ज्वारी तांदूळ गहू बाजरी अशा विविध प्रकारचे खाद्य कोंबड्यांना देऊ शकतो.

सर्वप्रथम तुम्हाला जास्त खर्च करण्याची आवश्यकता नाही तुम्ही 70 ते 80 कोंबड्या खरेदी करू शकता आणि त्यापासून तुम्ही अंड्यावरती कोंबड्या बसून जास्त प्रमाणामध्ये कोंबड्या वाढवू शकता जेणेकरून तुम्हाला जास्त खर्च करण्याची आवश्यकता होणार नाही आणि तुम्ही आपल्या घरीच जास्त कोंबड्या वाढवू शकता.

औषधोपचार करणे अतिशय महत्त्वाचे असते कोंबड्यांना त्यांच्या पाण्यामार्फत सर्दीचे औषधे देणे महत्त्वाचे असते कारण वातावरणामध्ये बदल झाला तर कोंबड्यांना सर्दी होते आणि सर्दी झाल्यानंतर कोंबड्यांचे वजन घटते त्यामुळे आपल्या उत्पादनावर खूप जास्त प्रमाणात फटका बसताना दिसून येतो. कोंबड्याचे लसीकरण औषध उपचार आणि आरोग्य सितापासणी करण्यासाठी प्रत्येक महिन्याला तुम्हाला 500 ते 2000 रुपये लागू शकतात.

कोंबडी पालनातून मिळणारे उत्पन्न

गावरान कोंबडी पालन सुरू केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम अंडी विक्री मधून उत्पन्न मिळणार आहे मित्रांनो एक गावरान कोंबडी वर्षभरामध्ये 150 ते 200 अंडी देते आणि बाजारामध्ये जर आपण एका अंड्याची किंमत पाहिली तर दहा रुपये सहजपणे आपल्याला मिळून जाते त्यामुळे जर तुम्ही सर्वप्रथम शंभर कोंबड्या जरी पाळल्या तर तुम्हाला एका वर्षामध्ये 1 लाख 20 हजार ते 1 लाख 40 हजार रुपयापर्यंत उत्पन्न मिळू शकते.

जर तुम्ही कोंबडी मासासाठी उत्पन्न केली तर एका कोंबडीला साधारणपणे 300 ते 400 रुपये किंमत सहजपणे मिळू शकते आणि त्यामुळे तुमच्या उत्पन्नामध्ये जास्त वाढ होते.

सर्वप्रथम तुम्ही शंभर कोंबड्यांपासून जर कुक्कुटपालन सुरू केले आणि जर तुम्हाला त्यामध्ये अनुभव भेटला तर तुम्ही पुढे जास्त कोंबड्या वाढवू शकता तुम्ही 400 ते 500 कोंबड्या देखील सहजपणे तुमच्या नैसर्गिक वातावरणामध्ये पाळू शकता आणि अतिशय चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवू शकता यामध्ये अंडी उत्पन्न जास्त प्रमाणामध्ये फायदेशीर ठरते मास विक्री करून देखील आपण जास्त उत्पन्न मिळू शकतो.

आज आपण गावरान कोंबडी पालनामध्ये कशाप्रकारे काळजी घ्यायची आणि आपण उत्पन्न कसे मिळवू शकतो याविषयी सविस्तर माहिती पाहिलेली आहे अशाच प्रकारे नवनवीन माहिती पाहण्यासाठी आताच आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

हे नक्की वाचा

मित्रांनो जर तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर लवकरात लवकर आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा कारण मित्रांनो आपल्या भारतामधील सर्व नवनवीन माहिती शेतकरी माहिती व्यवसायाबद्दल माहिती भारतातील नोकरी महाराष्ट्रातील नोकरी खाजगी नोकरी सरकारी नोकरी अशा विविध संदर्भ मध्ये माहिती तुम्हाला आपल्या वेबसाईट वरती मिळेल आणि आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती सर्वात आधी तुम्हाला माहिती मिळेल त्यासाठी लगेच आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा धन्यवाद.