Beed Jilha Mahiti | बीड जिल्हा विशेष माहिती बीड जिल्ह्यातील अतिशय सुंदर 10 पर्यटन स्थळे

Beed Jilha Mahiti

Beed Jilha Mahiti मित्रांनो बीड जिल्हा हा कृषीप्रधान जिल्हा असून विविध पिकांसाठी प्रसिद्ध असलेला हा जिल्हा आहे महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागातील एक महत्त्वपूर्ण जिल्हा म्हणून ओळखला जाणारा बीड जिल्हा सांस्कृतिक आणि भौगोलिक दृष्टिकोनातून महाराष्ट्राच्या सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित जिल्ह्यांपैकी एक जिल्हा मानला जातो.

Beed Jilha Mahiti
Beed Jilha Mahiti
आपला WhatsApp ग्रुप जॉईन करा Join Now

Beed Jilha Mahiti बीड जिल्ह्याचा क्षेत्रफळाचा जर आपण विचार केला तर 10,693 चौरस एवढं क्षेत्रफळ या जिल्ह्याचा आहे या जिल्ह्याच्या उत्तरेस जालना जिल्हा आहे आणि पश्चिम दिशेला अहमदनगर हा जिल्हा आहे बीड जिल्ह्यामध्ये डोंगराळ आणि सपाट हा दोन्ही प्रकारचा भाग आहे. या जिल्ह्यातील हवामानाचा जर विचार केला तर हवामान हे उष्णकटिबंधीय आहे.

बीड जिल्ह्याची लोकसंख्या जर आपण पाहिली तर 2011 च्या जनगणनेनुसार बीड या जिल्ह्याची लोकसंख्या ही 25 लाख एवढी आहे जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणातील लोक हे ग्रामीण भागामध्ये राहतात. आणि ग्रामीण भागातील लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे बीड जिल्ह्यामध्ये विविध समाजाचे लोक राहतात त्यामध्ये मराठा, धनगर, मुसलमान, बंजारा, वंजारी आणखी विविध जाती-जमातीचे लोक बीड जिल्ह्यामध्ये राहतात.

1.अंबाजोगाई योगेश्वरी मंदिर

मित्रांनो बीड Beed Jilha Mahiti जिल्ह्यामध्ये असलेला अंबाजोगाई तालुका या ठिकाणी योगेश्वरी देवीचे मंदिर आहे हे मंदिर धार्मिक आणि ऐतिहासिक असून अतिशय महत्वाचे ठिकाण मानले जाते या ठिकाणी अनेक ठिकाणावरून भाविक भक्त योगेश्वरी देवीचे दर्शन घेण्यासाठी येतात. त्याचबरोबर संतांच्या भूमीसाठी अतिशय जास्त प्रमाणामध्ये प्रसिद्ध असलेलं हे शहर म्हणजे अंबाजोगाई.

2.भगवानगड

मित्रांनो भगवानगड हे बीड Beed Jilha Mahiti जिल्ह्यामध्ये असलेले अतिशय सुंदर आणि धार्मिक स्थळ आहे श्री संत भगवान बाबा यांच्या नावे ओळखले जाणारे हे स्थळ आहे भगवान बाबा प्रसिद्ध वारकरी संत होते मित्रांनो भगवानगड हे संपूर्ण महाराष्ट्रातून भक्तांसाठी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे.

भगवानगड हे ठिकाण बीड जिल्ह्यामध्ये आहे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुका या ठिकाणी भगवानगड हे स्थळ आहे बीड पासून 30 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. या गडावर गेल्यानंतर संपूर्ण परिसराचे सुंदर दृश्य दिसते गडाच्या परिसरामध्ये हरित वातावरण आणि अतिशय शांत वातावरण देखील आढळून येते ज्यामुळे भक्त तिथे येऊन आत्मिक शांतीचा खूप जास्त प्रमाणामध्ये हा अनुभव घेतात.

भगवानगडावरती श्री संत भगवान बाबा यांचे मंदिर येणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी अत्यंत पवित्र स्थान आहे त्या ठिकाणी भगवान बाबा यांच्या प्रतिमेची देखील स्थापना करण्यात आलेली आहे.

भगवानगडावर येणाऱ्या सर्व भावी भक्तांसाठी सोयी सुविधा देखील खूप जास्त प्रमाणात करण्यात आलेले आहेत भगवानगडावरती जे कोणी भक्त येणार आहेत त्यांना दर्शनासाठी अतिशय चांगलं वातावरण आणि येणाऱ्या भक्तांसाठी भोजनाची आणि निवासाची व्यवस्था उपलब्ध आहे. तसेच गडावरती जाण्यासाठी अतिशय चांगले आणि सुंदर रस्ते देखील बनवण्यात आलेले आहेत.

3.परळी वैजनाथ मंदिर

Beed Jilha Mahiti बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाई तालुक्याला लागून असलेले परळी शहर मित्रांनो परळी वैजनाथ हे आपल्या भारतामधील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे धार्मिक माधवामुळे येथे अनेक ठिकाणावरून भाविक भक्त दर्शनासाठी येतात. मित्रांनो वैद्यनाथ ज्योतिर्लिंग हे शिवभक्तासाठी अत्यंत पवित्र मानले जाणारा स्थान आहे मंदिरातील वस्तू कला आणि अतिशय निसर्गरम्य वातावरण मनशांती प्रसन्न होणारा वातावरण या ठिकाणी आढळून येते.

4.सौताडा

मित्रांनो सौताडा हे ठिकाण आपल्या बीड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध आणि धार्मिक अतिशय सुंदर स्थळ आहे हे ठिकाण बीड जिल्ह्यामध्ये असलेल्या पाटोदा तालुक्यामध्ये आहे. सौताडा धबधबा मित्रांनो अतिशय सुंदर आणि महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे या ठिकाणी अतिशय सुंदर धबधबा आहे जो पावसाळ्यामध्ये भरपूर पाणी घेऊन वाहत राहतो अतिशय नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी अनेक ठिकाणावरून लाखो पर्यटक या ठिकाणी येतात सावताडा धबधबा हा फोटोग्राफीसाठी अतिशय चांगलं ठिकाण मानल जात.

या ठिकाणी सौताडेश्वर मंदिर अतिशय सुंदर आहे हे ठिकाण धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो हे मंदिर जे आहे हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे या ठिकाणी येणारे लाखो भक्त सौताडेश्वर च्या दर्शनासाठी येतात. मंदिराच्या परिसरामध्ये अतिशय शांत आणि निसर्गरम्य वातावरण आढळून येते तिथे गेलेला प्रत्येक जण हा मान प्रसन्न करून परत येतो एकदा गेलेला व्यक्ती तिथून लवकर येत नाही.

बीड जिल्ह्याचा इतिहास जर आपण पाहिला तर बीड जिल्ह्याचा इतिहास हा फार प्राचीन काळापासून सुरू झालेला आहे मित्रांनो बीड जिल्ह्याचे जुने नाव हे संपावतीनगर असे होते बीडचा इतिहास सातवाहन चालू के राष्ट्रकूट यादव बहमानी निजाम आणि आदिलशाही राजवटीची जोडलेला होता.

बीड जिल्ह्यामध्ये एकूण तालुक्याचा जर आपण विचार केला तर या जिल्ह्यात एकूण 11 तालुके आहेत त्यामध्ये कडा, पाटोदा, वडवणी, अंबाजोगाई, केज, धारूर, माजलगाव, परळी, आष्टी, गेवराई, आणि बीड असे एकूण 11 जिल्हे आहेत.

गावरान कोंबडीपालण करून महिना 50 हजार रुपये कमवा माहितीसाठी येथे क्लिक करा

5.माजलगाव तालुका

मित्रांनो माजलगाव तालुका हा एक बीड जिल्ह्यातील विशेष तालुका म्हणून ओळखला जातो या तालुका ऐतिहासिक सांस्कृतिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून खूप जास्त मोठ्या प्रमाणात महत्त्वपूर्ण आहे. माजलगाव तालुका हा शेतीप्रधान असून येथील प्रमुख व्यवसाय हा शेती आहे त्यावर ती उद्योगधंदे देखील जास्त प्रमाणामध्ये आहेत माजलगाव तालुक्यामध्ये वातावरण हे अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे.

या Beed Jilha Mahiti तालुक्याच्या पश्चिम दिशेला बीड जिल्हा आणि पूर्व दिशेला परभणी जिल्हा असे जिल्हे आहेत या तालुक्यांमध्ये उष्णकटिबंधीय हवामान पाहायला मिळते उन्हाळ्यामध्ये तापमान खूपच जास्त प्रमाणामध्ये वाढते तर हिवाळ्यामध्ये थंड हवामान जास्त प्रमाणात अनुभव घ्यायला मिळतो.

माजलगाव तालुक्याच्या लोकसंख्येचा जर आपण विचार केला तर 2011 च्या जनगणनेनुसार या तालुक्याची लोकसंख्या ही 2 लाख एवढी होती या तालुक्यांमध्ये मुख्यत लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये राहिलेले आहे. या तालुक्यांमध्ये मराठा समाज धनगर समाज आणि मुस्लिम समाज व बंजारा समाज या समाजाचे लोक जास्त प्रमाणामध्ये राहतात.

Beed Jilha Mahiti माजलगाव तालुक्यातील एक प्रमुख म्हणजे माजलगाव धरण मित्रांनो हे धरण माजलगाव तालुक्याला आणि परिसराला पाण्याचा पुरवठा करते यामुळे या भागामधील शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी या धरणांमधून पाणी मिळते आणि शेतकऱ्याचे चांगल्या प्रकारे शेती करून चांगलं उत्पन्न मिळू शकतात. हे धरण पिकनिक स्पॉट म्हणून ओळखले जाते या ठिकाणी अनेक लोक विश्रांतीसाठी देखील येतात.

पुणे जिल्ह्याची संपूर्ण माहिती येथे पहा पुणे तिथे के उणे

Beed Jilha Mahiti बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो कारण मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये पाण्याचा प्रभाव हा खूप कमी आहे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी पाण्याची कमतरता भासते त्यामुळे शेतामध्ये चांगले पीक येत नाही आणि येथील सर्व शेतकऱ्यांना दुसऱ्या राज्यांमध्ये ऊसतोड कामासाठी जावे लागते. कारण मित्रांनो शेतामध्ये उत्पन्न पिकत नसल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक गरजा भागवण्यासाठी ऊस तोडीचे काम करावे लागते.

त्यासाठी बीड जिल्ह्यातील शेतकरी हे विविध राज्यांमध्ये ऊस तोडणीचे काम करण्यासाठी जातात त्यामुळे ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून बीड जिल्हा ओळखला जातो.

शैक्षणिक दृष्टिकोनात हजर विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये अनेक शैक्षणिक संस्था आढळून येतात अंबाजोगाई या ठिकाणी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ आहे जिल्ह्यामध्ये भरपूर असे महाविद्यालय आणि शाळा शिक्षण संस्था देखील आहेत जिल्ह्यातील जास्त प्रमाणामध्ये विद्यार्थी हे पुणे मुंबई आणि औरंगाबाद यासारख्या मोठ्या शहरांमध्ये शिक्षण घेण्यासाठी जातात आणि आपले शिक्षण पूर्ण करतात कारण बीड जिल्ह्यामध्ये संपूर्ण शिक्षण पूर्ण होऊ शकेल अशा सुविधा नाहीत.

बीड जिल्ह्यामध्ये विशेष म्हणजे एका गोष्टीची कमतरता आहे ती म्हणजे रेल्वे मित्रांनो आपण जर पाहिलं तर आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि शहरांमध्ये रेल्वेची सुविधा उपलब्ध आहे. Beed Jilha Mahiti परंतु बीड जिल्हा एवढा गाजलेला जिल्हा असून देखील बीड जिल्ह्यामध्ये आणखीन रेल्वे सेवा उपलब्ध नाही स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी आश्वासन दिलेले होते की बीड जिल्ह्यामध्ये रेल्वे आनंद दाखवेल परंतु काळाने घात केला आणि दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे बीड जिल्ह्याला आतापर्यंत रेल्वेची सेवा मिळालेली नाही.

मित्रांनो आज आपण बीड जिल्हा विषयी अतिशय बारकाईने आणि संपूर्णपणे माहिती पाहिलेली आहे ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा तुम्ही जर आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन केलं नसेल तर लगेच आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती येणारी संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहील.

आपल्या ग्रुप वरती सर्व भारतातील नोकरी विषयीचे अपडेट सर्व जिल्ह्यांची माहिती योजना सरकारी नोकरी खाजगी नोकरी चे अपडेट सर्वात आधी आपल्या व्हाट्सअप वरती मिळते त्यासाठी लगेच आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा धन्यवाद.