Aaple Maharashtra Rajya |आपल्या महाराष्ट्राविषयी संपूर्ण माहिती व पाहण्यासारखी सुंदर ठिकाणे

Aaple Maharashtra Rajya मित्रांनो आपले महाराष्ट्र राज्य हे भारतामधील एक अतिशय महत्त्वाचे आणि समृद्ध सांस्कृतिक ऐतिहासिक आणि आर्थिक पद्धतीने तयार झालेले राज्य आहे. हे राज्य पश्चिम भारतामध्ये स्थित आहे आणि आपल्या देशांमधील क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे राज्य आहे.

Aaple Maharashtra Rajya
Aaple Maharashtra Rajya
आपला WhatsApp ग्रुप जॉईन करा Join Now

Aaple Maharashtra Rajya |आपल्या महाराष्ट्राविषयी संपूर्ण माहिती व पाहण्यासारखी सुंदर ठिकाणे

Aaple Maharashtra Rajya लोकसंख्येचा जर विचार केला तर मित्रांनो आपल्या भारतामधील दुसऱ्या क्रमांकावर ती लोकसंख्येच्या बाबतीमध्ये हे आपले महाराष्ट्र राज्य आहे पहिल्या क्रमांकावर ती उत्तर प्रदेश हे राज्य आणि दुसऱ्या क्रमांकावर ती महाराष्ट्र हे राज्य आहे. महाराष्ट्र राज्य च्या सीमा जर पाहिला तर गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा कर्नाटक आणि गोवा त्याचबरोबर अरबी समुद्राशी सीमा जोडलेल्या आहेत आणि आपल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी ही मुंबई आहे आणि मुंबई हे शहर भारताचे आर्थिक केंद्र म्हणून ओळखले जाते.

आपल्या महाराष्ट्र राज्याचे एकूण क्षेत्रफळाचा जर विचार केला तर एकूण क्षेत्रफळ हे तीन लाख 307,713 चौ किलोमीटर आहे आणि आपल्या राज्याच्या पश्चिमेकडील समुद्रकिनारा हा 720 किलोमीटर लांबीचा आहे यामध्ये जर पाहिला तर सह्याद्री पर्वतरांगा मुख्यत्वे महत्त्वाच्या आहेत ज्यातून अनेक प्रकारच्या नद्या उगम पावताना दिसून येतात. जसे की गोदावरी, कृष्णा, भीमा अशा विविध नद्यांचा उगम या ठिकाणी होतो राज्यांमध्ये पश्चिम घाट समुद्रकिनारे मैदानी आणि डोंगराळ प्रदेश मोठ्या प्रमाणात आहे.

राज्याची संस्कृती

आपल्या Aaple Maharashtra Rajya महाराष्ट्र राज्याची संस्कृती ही खूप जास्त प्रमाणे विविधतेने भरलेली आहे विशेष म्हणजे इथे संपूर्ण मराठी भाषा बोलली जाते ही भाषा महाराष्ट्र राज्याची राजभाषा आहे महाराष्ट्राच्या लोककला आणि संस्कृतीचा वारसा खूपच श्रीमंत दिसून येत आहे. लोकनरत्यांमध्ये लावणी कोळी नृत्य आणि तमाशा यांचा समावेश होतो हे महाराष्ट्राचे प्रमुख नृत्य आहेत याशिवाय महाराष्ट्रामध्ये गोंधळ भारुड कीर्तन त्याचबरोबर जागरण गोंधळ यासारखे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम महत्त्वाचे ठरलेले आहेत.

महाराष्ट्रामध्ये सणांचा जर विचार केला तर सणांमध्ये गणेशोत्सव हा सण सर्वात मोठा साजरा केला जातो आणि प्रसिद्ध देखील संपूर्ण महाराष्ट्रभर आहे या सणासाठी विविध भागातून लोक अतिशय मोठ्या उत्साहाने गणपती बाप्पांचे स्वागत करतात आणि सार्वजनिक मंडळातून मोठ्या प्रमाणामध्ये गणेशोत्सव साजरा करून आनंद साजरा करतात आणखी बरेच सण Aaple Maharashtra Rajya महाराष्ट्र राज्यांमध्ये साजरी केले जातात. त्यामध्ये प्रमुख म्हणजे दिवाळी, होळी, मकर संक्राती, नवरात्र त्याचबरोबर गुढीपाडवा गुढीपाडवा हा सण देखील महाराष्ट्रात प्रामुख्याने आणि मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो ग्रामीण भागातील व्यक्ती गुढीपाडव्यापासून नवीन वर्ष सुरू करतात मराठीमधील नवीन वर्ष हे गुढीपाडव्याला सुरू होतं.

महाराष्ट्र राज्यांमध्ये धार्मिक विविधता देखील खूप जास्त महत्त्वाचे ठरलेले आहे महाराष्ट्र राज्यामध्ये मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, हिंदू, अशा अनेक प्रकारच्या धर्माचे लोक राहतात. महाराष्ट्रामध्ये काही सुंदर ठिकाणांमध्ये अजंठा वेरूळ यासारखी ऐतिहासिक बौद्ध लेणी आहे जे की संभाजीनगर या शहरांमध्ये आहे.

या प्रकारचे अनेक मंदिर देखील महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत जी धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्वाचे ठरलेले आहेत आणि पाहण्यासारखी अतिशय सुंदर निसर्गरम्य वातावरण असलेली ठिकाणे आहेत या ठिकाणी तुम्ही एकदा नक्कीच जायला हवे व मन प्रसन्न करून घ्यायला हवे.

महाराष्ट्रात शेती

Aaple Maharashtra Rajya महाराष्ट्रमधील शेतीचा जर विचार केला तर मित्रांनो महाराष्ट्रातील खूप मोठा भाग हा शेतीप्रधान आहे मुख्य पिकांचा जर विचार केला तर कापूस, ऊस, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, तूर, गहू, आणि भात या प्रमुख पिकांचा समावेश होतो. राज्यामध्ये द्राक्ष, संत्री, डाळिंब, आणि आणखी विविध फळांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली जाते.

पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ अशा प्रकारची क्षेत्रे शेतीसाठी खूप चांगली आणि महत्त्वाची ठरलेली आहेत परंतु सध्या महाराष्ट्रातील काय भाग असा आहे ज्या ठिकाणी पाऊस पडत नाही तो भाग दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेला आहे ज्यामुळे तिथे पाण्याची खूप जास्त प्रमाणामध्ये कमतरता भासते.

कोणतीही जखम झाली तरी फक्त दोन दिवसात बरी करा या कडूलिंबाच्या सालीने

शिक्षण

शिक्षण क्षेत्राचा जर विचार केला तर आपला महाराष्ट्र हा शिक्षणाच्या क्षेत्रातही आघाडीवर आहे आपल्या राज्यातील पुणे हे शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जाणारे शहर आहे कारण तिथे अनेक नामांकित शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठ आहेत आपल्या महाराष्ट्र शासनाने शैक्षणिक क्षेत्र भक्कम बनण्यासाठी आणि सर्व गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी अनेक प्रकारचे उपकरण राबवले आहेत त्याचा फायदा महाराष्ट्र राज्यातील तरुण मुलांना व मुलींना खूप मोठ्या प्रमाणात होत आहे.

महाराष्ट्रातील पाहण्यासारखी काही ठिकाणी

मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये असे विविध प्रकारचे अतिशय निसर्गरम्य वातावरण असलेले काही पाहण्यासारखे ठिकाणी आहेत महाराष्ट्रामध्ये पर्यटनाचा देखील मोठा विकास झालेला आहे यामध्ये प्रमुख पाहिलं तर अजंठा वेरूळची लेणी त्याचबरोबर महाबळेश्वर, लोणावळा, माथेरान आणि अलिबाग यासारखी विविध प्रकारचे पर्यटन स्थळ आहेत.

Aaple Maharashtra Rajya या ठिकाणी विविध क्षेत्रातून पर्यटक निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी येत असतात मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर गेटवे ऑफ इंडिया त्याचबरोबर मरीन ड्राईव्ह आणि जुहू बीच ही प्रमुख पाहण्यासारखी आणि अतिशय सुंदर ठिकाणे आहेत संभाजीनगरच्या परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर अजिंठा वेरूळ लेणी जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखली जाणारी लेणी आहे आणि अतिशय निसर्गरम्य वातावरण असणारी लेणी आहे तुम्ही एक वेळेस त्या ठिकाणी नक्की जावे.

महाराष्ट्रातील समाज सुधारकांचा जर विचार केला तर महाराष्ट्रात अनेक समाज सुधारकांनी आपली भूमिका खूप मोठ्या प्रमाणामध्ये बजावलेली आहे त्यामध्ये प्रमुख म्हणजे महात्मा फुले त्याचबरोबर सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण आणि सामाजिक सुधारणेमध्ये खूप मोठी चळवळ सुरू केली त्यांनी महिलांच्या शिक्षणाचा निर्णय घेतला आणि त्यामुळे महिलांना खूप मोठा फायदा होत गेला त्याचबरोबर जातीभेद अशा विरोधामध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये लढा दिलेला आहे.

आपले महाराष्ट राज्य अतिशय सुंदर आणि इतिहासातील अतिशय जास्त चळवळी झालेले राज्य आहे म्हणून आपल्या राज्यात अनेक प्रकारची स्थळे आढळून येतात

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांच्या हक्कांसाठी लढत राहिले व दलितांना त्यांचा हक्क मिळवून दिला भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप मोठी भूमिका बजावलेली आहे. आणि खूप मोठे त्यांचे योगदान देखील आहे म्हणूनच आज तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांचे नाव आहे असे ब्रीदवाक्य तयार झालेले आहे कारण मित्रांनो बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप जास्त प्रमाणात चांगली कामे केलेली आहेत आणि मान उंच करून जगण्यासाठी आरक्षण देखील दिलेला आहे.

चित्रपटसृष्टी

मराठी चित्रपटसृष्टीचा जर विचार केला तर सुरुवाती १९१३ साली झालेली आहे तुम्हाला माहिती असेल दादासाहेब फाळके यांनी मराठी चित्रपट सृष्टीची सुरुवात केलेली आहे. यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आणि मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय सिनेमांचा पाया घातलेला आहे यांचा पहिला चित्रपट जर आपण पाहिला तर त्या चित्रपटाचे नाव आहे राजा हरिश्चंद्र या पहिल्या मूक चित्रपठाने भारतीय सिनेमाची सुरुवात झालेली आहे.

हा सिनेमा मित्रांनो पूर्णपणे मूक होता या सिनेमाचा कुठल्याही प्रकारचा आवाज येत नव्हता पहिला मूक चित्रपट हा राजा हरिश्चंद्र म्हणून ओळखला जातो मराठी चित्रपटसृष्टीने जागतिक स्तरावर ती आपली ओळख खूप मोठ्या प्रमाणात निर्माण केली आधुनिक मराठी चित्रपटांनी सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय विषयांना बाप देत खूप चांगल्या प्रकारे आपली ओळख निर्माण केलेली आहे त्यामध्ये काही प्रसिद्ध चित्रपट म्हणजे श्वास नटरंग सैराट हरिश्चंद्राची फॅक्टरी अशा विविध प्रकारचे प्रसिद्ध चित्रपट झालेले आहेत.

महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा आणि क्षेत्रफळाचा जर विचार केला तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत आणि महाराष्ट्रात एकूण तालुक्यांचा जर विचार केला तर 358 तालुके महाराष्ट्रामध्ये आहेत. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा हा अहमदनगर जिल्हा आहे जो की संभाजीनगर व बीड यांना लगत लागलेला जिल्हा आहे अहमदनगर जिल्ह्याचे आता नवनवीन नाव दिलेले आहे ते म्हणजे अहिल्यानगर अहिल्यानगर हे अहमदनगरचे नवीन नाव देण्यात आलेले आहे.

आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना ही Aaple Maharashtra Rajya 1 मे 1960 रोजी झालेली आहे मित्रांनो या दिवशी तात्कालीन बॉम्बे राज्याचे विभाजन करून महाराष्ट्र आणि गुजरात अशी दोन राज्ये तयार करण्यात आली प्रमुख जर पाहिला तर महाराष्ट्र राज्याची स्थापना ही मराठी भाषिक जनतेच्या सुसंघटित आणि दीर्घकालीन संघर्षानंतर झालेली आहे आणि महाराष्ट्र राज्य स्थापन होण्यास महाराष्ट्रातील अनेक प्रकारच्या समाजसुधारकांचा मोठा वाटा आहे.

महाराष्ट्र राज्याची स्थापना ही आपला भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतर भारतामध्ये भाषावर प्राथांच्या निर्मितीसाठी मोठी मागणी केली जात होती आणि त्यावेळी ब्रिटिश कालावधीतील बॉम्बे प्रेसिडेंट म्हणून ओळखले जाणारे राज्य अस्तित्वामध्ये आले होते ज्यामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्र गुजरात आणि काही दक्षिण भारतातील प्रदेश यांचा समावेश मोठ्या प्रमाणामध्ये झाला होता.

या प्रांतात वेगवेगळ्या भाषेतील लोक राहायला येत होते किंवा राहत होते ज्यामध्ये मुख्य म्हणजे मराठी आणि गुजराती भाषेत अनेक लोक होते त्यामुळे मराठी भाषेची जास्त प्रमाणामध्ये वाढ झाली आणि आपली महाराष्ट्र राज्य तयार झाले.

आपले महाराष्ट्र राज्य विविध प्रकारची माहिती पहा

अनेक प्रकारचे पर्यटन स्थळे आणि निसर्गरम्य वातावरण हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आढळून येतं मित्रांनो लोणावळा लोणावळा विषयी जर आपण पाहिलं तर जसं काही पृथ्वीवरचा स्वर्गच म्हणता येईल अतिशय सुंदर वातावरण तो ढगाळ प्रदेश ती थंड हवा डोंगरावर ती टेकलेले ढग आणि थेंब थेंब पडणारा पाऊस हे वातावरण जर तुम्ही अनुभवलं तर तुम्ही आयुष्यभर विसरणार नाहीत. असं वातावरण आहे हे लोणावळा या ठिकाणच तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये राहत असाल तर तुम्ही एक वेळेस लोणावळा नक्की पाहिला पाहिजे कारण मित्रांनो असं वातावरण एवढं सुंदर वातावरण आहे ज्याचा तुम्ही विचार देखील करू शकणार नाहीत.

आज आपण आपल्या महाराष्ट्र विषयी संपूर्ण माहिती पाहिलेली आहे जसं की महाराष्ट्र राज्याची स्थापना विविध प्रकारची धार्मिक आणि सांकेतिक स्थळे आणखी तुम्हाला महाराष्ट्र विषयी कोणती माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या वेबसाईट वरती जाऊन नक्की बघू शकता ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमचा मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.

हे नक्की वाचा

मित्रांनो जर तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर लगेच आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला महाराष्ट्रातील आणि भारतातील विविध प्रकारची माहिती निसर्गरम्य वातावरण नोकरी अपडेट्स योजना याविषयी सविस्तर माहिती आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती टाकलेली असते त्यासाठी लगेच आपला व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा धन्यवाद.