Bhagat Singh Biography| वीर भगतसिंग यांचे जीवन चरित्र | त्यांच्या आयुष्यातील शेवटचे 24 तास

Bhagat Singh Biography आज आपण वीर भगत सिंग यांच्या जीवन चरित्र विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत भगत सिंह हे एक भारतीय स्वातंत्र्य सेनानी आणि क्रांतिकारी होते. त्यांनी आपल्या भारतामध्ये झालेल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये खूप मोठी भूमिका बजावलेली आहे. वीर भगत सिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 रोजी पंजाब राज्यांमधील लायलपूर या जिल्ह्यामध्ये बंगा या गावात झाला होता. त्यांचे वडील एक शेतकरी कुटुंबातील होते.

Bhagat Singh Biography
Bhagat Singh Biography
आपला WhatsApp ग्रुप जॉईन करा Join Now

Bhagat Singh Biography| वीर भगतसिंग यांचे जीवन चरित्र | त्यांच्या आयुष्यातील शेवटचे 24 तास

Bhagat Singh Biography वीर भगत सिंग यांचे कुटुंब पहिल्यापासूनच स्वातंत्र्यसंग्रामात सक्रिय होते आणि त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सर्वांना लहानपणापासूनच त्यांच्या मनामध्ये देश प्रेम होते व त्यांच्या मनामध्ये पहिल्यापासूनच इंग्रजांविरुद्ध तिरस्कार होता.

भगत सिंग यांचे बालपण

भगत सिंग यांच्या वडिलांचे नाव किशन सिंग असे होते आणि त्यांच्या काकांचे नाव अजित सिंग असे होते हे दोघेही इंग्रजांविरुद्ध संघर्ष करणारे क्रांतिकारी होते. त्यांच्या कुटुंबामध्ये सर्वजण देशभक्तीने वेढलेले होते सर्वांना देशभक्तीचे खूप जास्त प्रमाणात वेळ होते. आणि याच गोष्टीमुळे भगतसिंग यांच्या मनामध्ये लहानपणापासूनच देशप्रेम जागृत झाले आणि इंग्रजांविरुद्ध त्यांच्या मनामध्ये तिरस्कार वाढू लागला. ते शाळेमध्ये असताना अतिशय बुद्धिमान होते त्याचबरोबर खूप चांगले वक्ते देखील होते ज्यावेळेस ते शाळेमध्ये शिकत होते तेव्हा स्वतंत्र्यलढ्याच्या विचारांनी प्रेरित झालेले होते.

त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी लाहोर या ठिकाणी नॅशनल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि त्या ठिकाणीच त्यांनी देशभक्तीचा अतिशय जास्त प्रमाणामध्ये अभ्यास केला त्याच काळामध्ये त्यांनी महत्त्वाची गोष्ट म्हणजे युरोपातील क्रांतिकारक चळवळीचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यास करून घेतला.

जालियनवाला हत्याकांड

Bhagat Singh Biography अमृतसर या ठिकाणी 1919 साली झालेला जालिया वाला बाग हत्याकांड यामुळे भगत सिंग यांच्या मनावरती अतिशय खोल परिणाम झाला या घटनेमध्ये आपण जर पाहिलं तर ब्रिटिश जनरल जो होता त्याने गोळीबाराचे आदेश दिले त्याचे नाव जनरल डायर असे होते. त्यांनी गोळीबाराचा आदेश देऊन लाखो जणांचा जागीच मृत्यू पाडला आणि याच रूढ घटनेमुळे भगतसिंग यांना इंग्रजांविषयी संपूर्ण माहिती मिळाली व त्यांच्या विरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळाली.

आणि याच घटनेमुळे भगत सिंग यांनी हे ठरवले की ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी मी माझ्या जीवन दान करणार म्हणजे ब्रिटिशांना येथून पळून लावण्यासाठी मी माझ्या जीवाचे बलिदान देखील देऊ शकणार आहे. परंतु ब्रिटिशांचा अत्याचार मी सहन करून घेणार नाही व माझ्या देशवासीयांना सहन करू देणार नाही असे त्यांनी मनामध्ये ठामपणे ठरवले आणि तेथून पुढेच ते ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी मैदानामध्ये उतरले.

महान संत श्री ज्ञानेश्वर महाराज जीवन चारित्र्य नक्की वाचा येथे क्लिक करा

भगत सिंग यांनी क्रांतिकारी चळवळीमध्ये प्रवेश करून घेतला त्यांनी 1923 मध्ये हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशन मध्ये सामील झाले मुख्य गोष्ट म्हणजे ती एक गुप्त क्रांतिकारी संघटना होती. त्यानंतर भगतसिंग यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये चंद्रशेखर आझाद यांच्याबरोबर खूप जास्त काम केले. त्याचबरोबर रामप्रसाद बिस्मिल यांच्यासोबत देखील त्यांनी खूप जास्त प्रमाणामध्ये काम केले अशफाकुल्ला खान आणि इतर अनेक मोठ्या क्रांतिकारकांसोबत काम करून त्यांनी ज्ञान मिळवले आणि ब्रिटिशांविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळवली.

1928 मध्ये लाला लजपतराय यांचा मृत्यू हा लाठीचार्ज ने झाला आणि हे लाटी चार्ज झाल्यामुळे भगतसिंग यांच्या मनाला खूप मोठी वेदना झाली आणि याच गोष्टीमुळे त्यांनी सांडर्सचे हत्या करण्याचे ठरवले कारण मित्रांनो ब्रिटिश पोलिसांनी लाला लाजपतराय यांच्यावरती लाठी चार्ज करून त्यांच्या डोक्यामध्ये लाटी मारली व त्यांना जागीच मृत्युमुखी पाडले त्या ठिकाणीच त्यांचा मृत्यू झाला याच गोष्टीचा बदला घ्यायचा म्हणून भगतसिंग यांनी लाठीचार्ज केलेल्या सांडर्शियांची हत्या गोळी घालून केली. आणि त्यांची हत्या केल्यानंतर ते फरार झाले त्यानंतर भगतसिंग यांनी आपला वेश बदलून राहणे सुरू केले.

असेंबली बॉम्ब प्रकरण

भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी ब्रिटिश सेंट्रल असेंबली मध्ये निशस्त्र बॉम्ब फेकून ब्रिटिश सरकारला खूप मोठा धक्का दिला ही घटना 1929 मध्ये भगतसिंग आणि त्यांचे साथी बटुकेश्वर दत्त या दोघांनी मिळून केली. हा बॉम्ब कुठल्याही प्रकारचा स्फोटक किंवा व्यक्तींना घातक ठरणारा नव्हता तर हा फॉर्म हल्ला केवळ इंग्रज सरकारच्या कानावरती आवाज घालवण्यासाठी टाकलेला होता या बामणे कोणालाही इजा झालेली नाही. हा बॉम्ब फेकल्यानंतर फक्त दुपार आले व सगळीकडे धूप तयार झाली यानंतर भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त या दोघांनीही स्वतःला अटक करून दिले.

भगतसिंग यांना अटक करण्यात आले व अटक झाल्यानंतर देखील त्यांनी तुरुंगामध्ये राहून सुद्धा संघर्ष सुरू ठेवला होता त्यांनी तुरुंगामध्ये राजबंदी म्हणून वागणूक मिळावी यासाठी मागणी केली होती. आणि या मागणीसाठी भगतसिंग यांनी उपोषण देखील केले होते हे उपोषण त्यांचे 116 दिवसापेक्षा जास्त काळ चालले होते आणि याच गोष्टीमुळे ब्रिटिश सरकार वरती खूप मोठा दबाव निर्माण झाला होता.

तुरुंगामध्ये असताना भगतसिंग यांनी एक लेखन कार्य सुरू केले त्यांनी मी नास्तिक का आहे या नावाने एक लेख लिहिला होता.

Bhagat Singh Biography भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या तिघांना सांडर्स हत्या प्रकरणी या तिघांनाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि भगतसिंग सुखदेव राजगुरू या तिघांनाही 23 मार्च 1931 रोजी लाहोर मध्ये असलेल्या तुरुंगामध्ये फाशी देण्यात आली जेव्हा भगतसिंग यांना फाशी देण्यात आली होती तेव्हा त्यांचे वय फक्त 23 वर्षे होते आणि ज्या दिवशी भगतसिंग यांना फाशीची शिक्षा देणार होते त्या दिवशी त्यांचे शब्द फक्त इन्कलाब जिंदाबाद आणि क्रांती अमर राहो असे शब्द शेवटचे भगतसिंग यांचे होते.

भारतातील महान क्रांतिकारी पुरुष होऊन गेले संपूर्ण जीवन चारित्र्य वाचा येथे

चंद्रशेखर आझाद यांचे जीवन

मित्रांनो चंद्रशेखर आझाद हे आपल्या भारतामध्ये झालेल्या स्वयंत्रालयामध्ये एक थोर क्रांतिकारी आणि देशभक्त म्हणून ओळखले जात होते आणि त्यांनी त्या प्रकारे काम देखील केला आहे अत्यंत मोठा वाटा त्यांचा आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये आहे. त्यांनी ब्रिटिश समाजाचा विरोधामध्ये सशस्त्र संघर्ष केलेला आहे मित्रांनो चंद्रशेखर आझाद यांचा जन्म हा 23 जुलै 1906 रोजी मध्य प्रदेश राज्यामध्ये झाला मध्य प्रदेश राज्यातील बाबरा या जिल्ह्यांमध्ये झाला होता मित्रांनो चंद्रशेखर आझाद यांचे नाव चंद्रशेखर तिवारी होते परंतु त्यांनी आपले स्वतःचे नाव आझाद म्हणजे स्वतंत्र असे ठेवले होते कारण ते कधीही ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये येणार नाहीत असे ते म्हणायचे आणि त्यांचा निर्धार देखील होता.

चंद्रशेखर आझाद यांच्या वडिलांचे नाव पंडित सिताराम तिवारी असे होते आणि त्यांच्या आईचे नाव जगदीश कौर असे होते चंद्रशेखर आझाद यांचे कुटुंब साधे आणि धार्मिक होते परंतु त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रेमाची भावना खूप जास्त रुजलेली होती आणि ती लहानपणापासूनच होती लहान असतानाच त्यांना ब्रिटिश अत्याचारांची जाणीव झाली ते वयाचे 14 वर्षाचे असताना ते बनारस म्हणजे वाराणसी येथे शिकण्यासाठी गेले त्या ठिकाणी त्यांनी संस्कृत आणि वेदांचा खूप जास्त प्रमाणामध्ये अभ्यास करून घेतला त्याच काळामध्ये त्यांच्या मनामध्ये देशभक्ती जागृत झाली आणि स्वातंत्र्यलढ्यासाठी प्रेरणा मिळाली व तेथून त्यांनी ठरवले ब्रिटिश सरकारला पळून लावायचे व आपला देश स्वतंत्र्य करायचा.

महात्मा गांधी यांनी सुरू केलेली असहकार चळवळ 1921 साली सुरू झालेली होती त्यामध्येच चंद्रशेखर आझाद हे सामील झाले त्यावेळी ते फक्त पंधरा वर्षाचे होते या चळवळीमध्ये सहभाग घेतल्यानंतर त्यांनी ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये खूप मोठी निदर्शने केली. त्यावेळी त्यांना जर त्यांचे कोणी नाव विचारले तर ते चंद्रशेखर तिवारी असे न सांगता चंद्रशेखर आझाद असे सांगायचे आणि वय विचारल्यावर 14 वर्षे सांगायचे त्यांच्या वडिलांचे नाव काय असे जर विचारले तर ते स्वातंत्र्य असे सांगायचे. आणि याच धाडसी उत्तर ते मुळे त्यांना पंधरा काट्यांचा दंड देण्यात आलेला होता. आणि त्यानंतर त्यांनी स्वतःचे नाव आझाद असे ठेवले.

मित्रांनो चंद्रशेखर आझाद हे काही काळ झाशीमध्ये लपून राहायचे आणि झाशीमध्ये लपून राहून त्यांनी आपल्या क्रांतिकार क चळवळीचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नेतृत्व केले ज्यावेळेस ते झाशीमध्ये लपून राहायचे तेव्हा आपल्या सहकाऱ्यांना सशास्त्र प्रशिक्षण त्यांनी दिले आणि त्यांना सशस्त्र लढासाठी अतिशय भक्कमपणे तयार केले याच काळामध्ये त्यांनी स्थानिक लोकांमध्येही जनजागृती निर्माण केली आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये देशभक्तीचा प्रचार करून हम आजाद है अशी घोषणा केली.

चंद्रशेखर आझाद यांना आपल्या संघटनेच्या गरजा भागवण्यासाठी अनेकदा धाडसी कामे करावी लागली ज्यामध्ये त्यांचा जीव देखील जाऊ शकत होता असे कामे त्यांनी केली त्यामध्ये जर पाहिलं तर ब्रिटिश सरकारची तिजोरी देखील चंद्रशेखर आझाद यांनी लूटली कारण त्यांना आपल्या संघटनेला जगवायचे होते आणि मोठे करायचे होते ब्रिटिश सरकार विरुद्ध लढण्यासाठी बळ मिळवून द्यायचे होते त्यांनी ब्रिटिश सरकारची तिजोरी लुटली ज्यामुळे त्यांनी आपल्या क्रांतिकारक चळवळीचा खूप मोठा विस्तार करून दाखवला.

चंद्रशेखर आझाद यांनी आपल्या जीवनामध्ये एक गोष्ट ठरवली होती मला मरण देखील आले तरी मी स्वतः मरेल पण मी ब्रिटिश सरकारच्या हाती लागणार नाही आणि यानंतर 27 फेब्रुवारी 1931 रोजी ब्रिटिश पोलिसांनी त्यांना अलाहाबाद येथे एल ब्रेड पार्क या ठिकाणी घेरले सध्या आजचा चंद्रशेखर आजाद पार्क नावाने ओळखले जाते त्यांनी पोलिसांशी तिथे झुंज केली परंतु त्याआधी चंद्रशेखर आझाद यांनी आपल्या साथीदारांना सुरक्षितपणे बाहेर जाण्याची संधी दिली आणि शेवटपर्यंत पोलिसांबरोबर लढाई करत राहिले.

ज्यावेळेस चंद्रशेखर आझाद यांच्या बंदुकीमध्ये फक्त एक ओळी शिल्लक होती तेव्हा चंद्रशेखर आझाद यांनी ती गोळी स्वतःच्या डोक्यामध्ये झाडली आणि त्यांचे जीवन संपवले परंतु ते ब्रिटिश पोलिसांच्या हाती लागले नाहीत हे त्यांनी जिवंतपणे सांगितले होते की मी स्वतः मृत्युमुखी होईल पण ब्रिटिश सरकारच्या ताब्यामध्ये जाणार नाही आणि तसेच त्यांनी शेवटी केले त्यांनी स्वतःवरती गोळी झाडली आणि त्यांना वीरमरण आले.

त्यांच्या बलिदानामुळे भारत देशातील तरुणांसाठी खूप मोठी प्रेरणा मिळालेली आहे.

आज आपण कशाप्रकारे भगतसिंग यांनी आपल्या जीवनाचा त्याग हा आपल्या भारत देश स्वातंत्र्य होण्यासाठी हसत हसत दिलेला आहे आपल्या जीवाची परवा न करता ते फाशी वरती चढले आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले कोण म्हणता आपला देश स्वातंत्र्य हा महात्मा गांधी मुळे झालेला आहे नाही मित्रांनो मुख्य कारण म्हणजे भगतसिंग सुखदेव राजगुरू चंद्रशेखर आझाद यांच्या बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालेला आहे यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि अमर रहो भगतसिंग सुखदेव राजगुरू.

हे नक्की वाचा

मित्रांनो अशाच प्रकारे नवनवीन माहिती जीवन चरित्र आपल्या देशामध्ये झालेले महापुरुष आपल्या महाराष्ट्रातील न्यूज भारतातील न्यूज संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी आत्ताच आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती तुम्हाला नोकरी विषयी अपडेट योजना विषयी अपडेट सर्व माहिती व्हाट्सअप ग्रुप वरती मिळेल वर दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आत्ताच जॉईन करा धन्यवाद.